नागपूर महाराष्ट्र

….तर भाजपचंही एक दिवस काँग्रेस होईल- महादेव जानकर

Loading...

नागपूर |  सत्ताधारी भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजप प्रवेश असेच होत राहिले तर भाजपचा काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे.

नागपूरच्या संताजी सांस्कृतिक सभागृहात रासपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यात विरोध पक्षच उरला नाही. आता राज्यात आमची ताकद आहे. राज्यात रासपचे 98 जि.प. सदस्य, 18 नगरसेवक, 4 नगराध्यक्ष, 3 सभापती, 6 उपनगराध्यक्ष आणि 2 आमदार आहेत. हीच परिस्थिती लक्षात घेता आणि रासपची वाढलेली ताकद पाहता आम्ही भाजपकडे 57 जागा मागितल्या आहेत, असं जानकर यांनी सांगितलं.

5 वर्ष आम्ही कामांचा धडाका लावल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा आम्हाला संधी दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास  यावेळी त्यांनी व्यक्त केला.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष; या माजी मुख्यमंत्र्यांचा पक्षाला घरचा आहेर!

-पक्षातील नवीन चेहरे समोर आणणार; विधानसभेच्या तोंडावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य

-धक्कादायक!!! मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात अ‌ॅम्बुलन्समधून अवैध दारूची वाहतूक….

-ही अभिनेत्री म्हणते… सलमान खान माझ्याशी लग्न करणार आहे!

-शरद पवार म्हणतात… कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी!

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या