बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जानकरांकडे 30 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या डॉक्टरला यासाठी मिळाला जामीन!

पुणे | राज्याचे तत्कालीन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याची धमकी देऊन ३० कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या गुन्ह्यात मोकाअंतर्गत येरवडा कारागृहात असलेल्या डॉक्टरला जामीन मंजूर झाला आहे. डॉ. इंद्रकुमार देवराव भिसे (वय ५२, रा. शिरुर) असं त्यांचं नाव आहे.

कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी जामीन देण्यात यावा, अशी मागणी करत त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जामीनाच्या सुनावणीला डॉ. भिसे हे येरवडा जेलमधून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हजर होते.

न्यायालयाने संबंधित डॉक्टरला ससून रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांवर आठवड्यातून पाच दिवस उपचार करण्याच्या अटीवर ६० दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एन. सिरसीकर यांनी हा जामीन मंजूर केला.

साक्षीदारांवर दबाव टाकू नये, जामीनाची मुदत संपण्याअगोदर कारागृहात हजर राहावे, ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांचे प्रमाणपत्र सादर करावे, या अटींवर न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात 2361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, पाहा तुमच्या भागातील कोरोना रुग्णांचा तपशील

कोरोनाचा पुण्याला दिलासा, मात्र मुंबईत आज धक्कादायक आकडा

गुडन्यूज! पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट, आज सापडले फक्त एवढे रुग्ण

महत्वाच्या बातम्या-

खडकवासल्यातून मलाच उमेदवारी मिळणार होती, मात्र… रुपाली चाकणकरांचा मोठा खुलासा

चित्राताईंनी पक्ष सोडल्यानं प्रदेशाध्यक्षपद मिळालं त्यांचे आभार मानाल का?, चाकणकर म्हणतात…

आम्हाला सलून उघडायला परवानगी द्या, नाहीतर….; सलून व्यावसायिक आक्रमक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More