Top News राजकारण

महादेव जानकरांनी शरद पवारांची घेतली भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुणे | राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपचा मित्र पक्ष मानला जातो. याशिवाय भाजप सरकार असताना महादेव जानकर मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री देखील होते. तर जानकर आणि पवार यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पुण्यातील मांजरीमध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये शरद पवार आणि महादेव जानकर यांची भेट झाली. यांच्यामध्ये जवळपास दीड तास चर्चा सुरु होती.

दरम्यान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या परवान्यासाठी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलं. शिवाय या भेटीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना कळवलं असल्याचंही जानकर म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

…तर आम्ही आरक्षण सोडायला तयार- रामदास आठवले

राहुल गांधींसह विरोधी पक्षाचे 5 बडे नेते राष्ट्रपतींना भेटणार!

…म्हणून आम्ही पवार साहेबांना भेटलो- रत्नाकर गुट्टे

शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये येण्यास तृप्ती देसाई यांना बंदी!

कृषी कायद्यावर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लागेल- मेधा पाटकर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या