…म्हणून शेतकऱ्यांच्या नातवंडांना ब्रेनट्युमर होतो- जानकर

नाशिक | शेतकऱ्यांनी दुधात भेसळ करु नये, तशी भेसळ केल्याने शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या नातवंडांना ब्रेनट्युमर होतो, असं धक्कादायक वक्तव्य दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केलंय.

सिन्नर दूध उत्पादक संघाचे नेते माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकाराने बसवलेल्या दूध एटीएमची पाहणी करण्यासाठी महादेव जानकर नाशिकमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं.

दरम्यान, वकील-इंजिनिअर होण्यापेक्षा दुधाचा व्यवसाय करा, दहा जणांना रोजगार मिळेल. ऊस आणि द्राक्ष उत्पादकांनीही पाच गायी पाळाव्यात असं मला वाटतं, असंही ते यावेळी म्हणाले.