देवेंद्र फडणवीस पंतप्रधान बनतील; महादेव जानकर यांची भविष्यवाणी

पुणे | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजांना न्याय देणारे आहेत. ते भविष्यात देशाचे पंतप्रधान बनतील, असा विश्वास दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. ते पुण्यात ब्राह्मण समाजाच्या कार्यक्रमात बोलत होते. 

ब्राह्मण समाज जात नसून ती एक व्यवस्था आहे. देशात एकात्मता राखण्याचे काम ब्राह्मण समाजाने केले. या समाजाने देशाला अनेक नेतेसुद्धा दिले, असं महादेव जानकर म्हणाले. 

आमचा साधा नगरसेवक झाला तर त्याची बायको साधी गाडीची काच खाली घेत नाही. मुख्यमंत्र्यांची बायको मात्र रोज बँकेत कामाला जाते, अशा शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांची स्तुती केली. 

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देखील दिला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…या कारणामुळे बाद झाल्यानंतरही पृथ्वी शॉ मैदानात थांबला होता!

-शरद पवारांचं राजकारण कोणीही ओळखू शकत नाही- नितीन गडकरी

-राजे की पाटील? नेमकी कुणाला मिळणार ‘राष्ट्रवादी’ची उमेदवारी???

-ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाला मंत्री महादेव जानकर यांचा पाठिंबा

-पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त केल्याची घोषणा; मात्र तेवढ्या रुपयांची कपात नाहीच!