सरकारचा प्रस्ताव चुकीचा, जानकरांमुळे सरकारवर नामुष्की

मुंबई | नियम २६० अन्वये सरकारने मांडलेला प्रस्ताव चुकीचा असल्याची कबुली खुद्द दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली. त्यामुळे सरकारला नामुष्कीचा सामना करावा लागला.

सरकारने मांडलेल्या प्रस्तावात ‘दुधाच्या विक्री दरात ३ रुपयांची वाढ केली’ असा उल्लेख होता. त्यावर आमदार रामहरी रुपनवर यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ‘दुधाच्या विक्री नव्हे तर खरेदी दरात ३ रुपयांची वाढ केली’ असं म्हणत सरकारचा प्रस्ताव चुकीचा असल्याची कबुली जानकरांनी दिली.

दरम्यान, सहकारमंत्र्यांनी यावेळी सारवासारव करत जानकरांचं वक्तव्य कामकाजातून वगळण्याची मागणी केली. मात्र मंत्र्यांचं वक्तव्य असल्यानं सभापतींनी ती फेटाळून लावली. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या