बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महादेव जानकर पुन्हा पवारांना शह देण्याच्या तयारीत!

पुणे | महाराष्ट्रातून फिरुन येऊन मी बारामती लोकसभा मतदारसंघात मुक्कामासाठी येतोय. बारामतीच्या सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मला खूप भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे मी बारामतीकरांना वाऱ्यावर सोडणार नाही. बारामतीत लक्ष घालून मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहून पुढील रणनीती आखण्यासाठी माझे हे दौरे आहेत. असं माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी बारामतीतून पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर हे मागील तीन दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी करत आहेत. जुन्या मित्रांना भेटून त्यांच्यात मिसळून सायकलिंग करणे, पोहणे, रानावनात मुक्काम करत ते लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. जानकर पुन्हा बारामती लोकसभा लढवण्याच्या तयारीत आहेत.

2009 मध्ये महादेव जानकरांनी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, शरद पवारांनी विजय मिळवला, तर जानकर तिसऱ्या स्थानी फेकले गेले होते. त्यानंतर 2014 मध्ये महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात शड्डू ठोकला होता. परंतु 69,719 च्या मताधिक्याने सुप्रिया सुळे विजयी झाल्या.

दरम्यान, अधिवेशन संपेपर्यंत वीज तोडणार नाही यावर सरकारने होकार दिला आणि अधिवेशन संपताच वीज तोडणी सुरू केली. हे योग्य नाही. आघाडी सरकार देखील शेतकऱ्यांची हिताचे आहे, मात्र आघाडी सरकारच्या मंत्र्यांना त्यांनी विनंती करत शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करावी, नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष मोठे आंदोलन उभारेल, असा इशाराही जानकरांनी दिला.

थोडक्यात बातम्या –

महिंद्रा जीप चालकाचा ‘हा’ प्रताप वाचून तूम्हीही व्हाल हैराण

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू; लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

पंतप्रधानांनी बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची तडकाफडकी बैठक; कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता

मास्कच्या कारवाईसाठी गाडी थांबवली, तरुणाच्या कृतीनं पोलीसच पळू लागला, पाहा व्हिडीओ

अवघ्या 12 वर्षांच्या बहिणीसोबत सख्या भावाने केलं ‘हे’ दुष्कृत्य; बहीण-भावाच्या नात्याला काळीमा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More