बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात सांगितलं होतं, हा महादेव जानकर मेला तरी…”

बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थित भगवान भक्तीगडावर शुक्रवारी दसरा मेळावा झाला. या दसऱ्या मेळ्याव्याला खासदार प्रीतम मंडें यांच्याबरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे देखील उपस्थित होते. भगवान गडावर केलेल्या भाषणात गोपीनाथ मुंडेंची एक आठवण महादेव जानकर यांनी सांगितली आहे.

सावरगावाची निर्मिती पंकजा मुंडे यांनी केली आहे. पंकजा मुंडेंचं हेलिकॉप्टर या ठिकाणी फिरलं नाही तर कोणी आमदार खासदार होणार नाही. पक्ष येतील आणि जातील माणूस जिवंत राहिला पाहिजे. आमच्या मनाच्या हिंमतीने उभं राहण्याचा प्रयत्न करू. गोपीनाथ मुंडेंनी 31 मे राजी माझ्या कानात सांगितलं होतं. पंकजा आणि प्रीतमची साथ सोडू नका. पंकजाताई, प्रीतमताई हा महादेव जानकर मेला तरी तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही काळजी करू नका, असं महादेव जानकरांनी भाषणात सांगितलं.

नेता हा बनवता येत नाही. त्याला कसल्याही प्रकारचा नाटक करता येत नाही. तो खरा पाहिजे. त्याला रक्तातून बनावं लागत आणि रक्ताचं असावं लागतं, हे लक्षात ठेवा. गोपीनाथ मुंडे नसते तर मी मेेंढरं हाकत बसलो असतो. पंकजा ताई काळजी करू नका माझा पक्ष उत्तर प्रदेशात देखील चांगल काम करत आहे. तुम्ही त्याठिकाणी आमदार, खासदार व्हाल, असंही महादेव जानकर म्हणाले.

दरम्यान, कोणत्या नेत्याची चमचेगिरी नाही तर भगवानदादा आणि लोकांसाठी मी भगवानगडावर आलो आहे, ही जी भक्तीची आणि जी शक्तीची जी परंपरा कायम ठेवण्यासाठी तुम्ही घरची पूरणपोळी सोडून या ठिकाणी आला आहात, त्यामुळे मी तुमचं सगळ्याचं आभार मानते, असं पंकजा मुंडे देखील भगवान भक्तीगडावर म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

‘त्या’ ऑडिओ क्लिपबाबत रामदास कदम यांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, म्हणाले…

IPL 2021चा चॅम्पियन कोण? फायनलमध्ये ‘या’ 8 खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

“आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसेना”

“महाराष्ट्राच्या घोटाळेबाज सरकारच्या घोटाळ्यांच्या पुतळ्याचं आज दहन करणार”

ट्विटरवर होतोय ‘आज का रावण नरेंद्र मोदी’ हा हॅशटॅग ट्रेंड’; तब्बल एवढ्या लोकांनी केलंय ट्विट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More