मुंबई | राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा आज डाॅ. मिताली बोरुडे यांच्याशी विवाह पार पडला. मात्र या विवाह सोहळ्याला निमंत्रण न मिळाल्याने पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अमित ठाकरेंच्या लग्नाबद्दल मला माहितच नाही. मला पत्रिका मिळाल्यास मी शुभेच्छा द्यायला जाईन, असं त्यांनी म्हटलं आहे.
अमित-मिताली यांचा विवाह आज मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, या विवाह समारंभाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
महत्वाच्या बातम्या-
-पहिल्यांदाच मिशी कापली होती, तेही फक्त बाळासाहेबांसाठी- प्रविण तरडे
-बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर करणार भाजपमध्ये प्रवेश
–ठाकरेंनी स्वत:ची औकात ओळखावी आणि गपचूप भाजपचे पाय धरुन युती करावी- निलेश राणे
-भाजपच्या खासदाराने आप-काँग्रेसच्या नेत्यांना भर कार्यक्रमात शिवी हासडली!
–अमित ठाकरे, मिताली बोरुडे चा शाही विवाहसोहळा संपन्न