बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर होईन”

कोल्हापूर | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात सातत्याने आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळलेलं असताना आता राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांंनी आपण एक दिवस पंतप्रधान होणार असल्याचा दावा केला आहे. ते आज कोल्हापूरात बोलत होते.

मी कोणाचाही गुलाम नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. टार्गेट दिल्ली ठेवून पक्षाची वाटचाल सुरू आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी मी कोणाचाही आधार घेईन पण एक दिवस पंतप्रधान नक्की होईल, असा दावा  महादेव जानकर यांनी केला आहे.

तसेच भाजपचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा रस्ता डांबरीकरणाचा आहे. मी मात्र पाणंदीने पुढे चाललो आहे. माझा देखील सूर्य केव्हा तरी उगवेल, असं देखील जानकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्यावरुन नुकतंच भाजपने राज्यभर चक्का जाम आंदोलन केलं होतं. येत्या 4 तारखेला राष्ट्रीय समाज पक्ष देखील राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती जानकर यांनी आज दिली आहे.

थोडक्यात बातम्या –

“आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने पडणार, फक्त वेळेचा प्रश्न आहे”

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ

“केंद्राला काय करायचं ते करूद्या, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”

सीताच्या भूमिकेसाठी करीनाने मागितलं होतं ‘इंके’ मानधन, तापसीनं केली बेबोची पाठराखण

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं! तरूण शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून बनवलं पेरणी यंत्र

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More