बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा-धनगर समाज एकत्र आल्यास, दिल्लीची गादी हस्तगत करु”

जेजुरी | मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी केलं आहे.

महादेव जानकरांनी हे वक्तव्य शरद पवारांसमोर केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे.

जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झालं. या कार्यक्रमाला होळकर घराण्याचे वंशज आणि छत्रपती संभाजीराजे हे देखील उपस्थित होते. यावेळी जानकर बोलत होते.

आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असं महादेव जानकरांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

…तर आज काश्मिरी तरुण IAS आणि IPS अधिकारी असते- अमित शहा

“शिवजयंती धूमधडाक्यातच झाली पाहिजे, कुठलं सरकार आम्हाला थांबवू शकत नाही”

“पूजा चव्हाणला न्याय देण्याची तुमच्यात धमक नाही”

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आरजे राघव… पोराच्या एका व्हिडीओनं आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More