इंदापूर | माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रासपकडे तिकीट मागत आहेत, असा गौप्यस्फोट पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केला आहे.
महादेव जानकर लाखेवाडी येथील चारा छावणीला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी ते बोलत होते.
आघाडीच्या जागावाटपात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची जागा सोडली नाही तर हर्षवर्धन पाटील यांना रासपकडून लढण्याची वेळ येणार आहे, असं जानकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून सूचित होत आहे.
दरम्यान, जानकरांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर!
-काम करून घ्यायची धमक नसेल तर कामे कशी होतील?- शरद पवार
-अमोल कोल्हेंची आढळराव पाटलांवर बोचरी टीका; म्हणतात…
-मीही तुमचा नातू, मला विधानसभेची उमेदवारी द्या!
-खात्यात 15 लाख येणार??? लोकांच्या बँकांबाहेर रांगा!
Comments are closed.