मुंबई | पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण पृथ्वीराज देशमुख यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय.
जानकर यांनी भाजपच्या एबी फाॅर्मवर निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार देत रासपकडून उमेदवारी दाखल केली होती. त्यानंतर भाजपने एेनवेळी पृथ्वीराज देशमुखांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे जानकरांची उमेदवारी धोक्यात आली होती.
दरम्यान, पृथ्वीराज देशमुख यांनी विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मी वारी केली नाही, पण कधी अनादरही केला नाही- शरद पवार
-संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही; भुजबळांचा भि़डेंवर निशाणा!
-गोपाळ शेट्टींचे काय चुकले?; सामनाच्या अग्रलेखात भाजप खासदाराची पाठराखण
-शरद पवारांनी आंब्यावर भाष्य करताच सभागृहात हशा!
-अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच खेळाडू!