मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नियोजित दुसरा टप्पा 5 दिवस पुढे ढकलला आहे. दुसरा टप्पा 21 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान 11 दिवसांचा असून तो नंदुरबारमधून चालू होणार असल्याची माहिती यात्रेचे प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे. सांगली कोल्हापूरात आलेल्या पुरामुळे या यात्रेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
महाजनादेश यात्रा दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्हे, 55 मतदारसंघातून जाणार आहे. यात 39 जाहीर सभा होणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा 1839 किमी प्रवास करणार असून समारोप 31 ऑगस्टला सोलापूर येथे होणार आहे.
पूरग्रस्त पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर हे जिल्हे महाजनादेश यात्रेतून वगळले असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून थांबवण्यात आलेल्या यात्रांचा पुढच्या टप्प्यांच्या तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.
महत्वाच्या बातम्या-
-“जनाची नाही मनाची असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्या 2 मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत”
-“केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही भाजपचंच सरकार तरी पाणी सोडलं नाही”
-वंचितचं निवडणूक चिन्ह ठरलं; कुणाला ठेवणार ‘गॅस’वर??
-प्रतीक्षा संपली…! बहुचर्चित ‘पळशीची पीटी’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
-“पुलवामासारख्या घटनांचा जाब विचारला तर गद्दार ठरवलं जातं”
Comments are closed.