बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महामंडलेश्वर भागवतानंदगिरी महाराज यांचे निधन, नुकतेच कुंभमेळ्यावरुन परतले होते

औरंगाबाद | श्री क्षेत्र वेरुळ येथील कैलास आश्रमाचे मठाधिपती श्री महामंडलेश्वर स्वामी भागवतानंदगिरीजी महाराज यांचं निधन झालं आहे. कोरोना झाल्याने त्यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटक्याने त्याचं निधन झालं आहे.

स्वामी भागवतानंदगिरीजी महाराज यांच्या निधनाने वेरुळ सह परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली. महाराजांचा वेरुळ परिसरासह राज्यात तसेच परराज्यात मोठा भक्त परिवार आहे.

महामंडलेश्वर भागवतानंदगिरी महाराज यांच्या समाधीचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला. तसेच महामंडलेश्वर भागवतानंदगिरीजी महाराज हे 15 दिवसांपूर्वीच कुंभमेळ्यावरुन परतले होते. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. अशात हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत तीन शाहीस्नान झाले असून त्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. शाही स्नानासाठी साधू संतांनी मोठी गर्दी केली होती. परिणामी कुंभात कोरोनाचा विस्फोट झालेला.या गर्दीतूनच कोरोनाच्या संसर्गाला निमंत्रण मिळून गेल्याची टीका सर्व स्तरातून केली जात होती. 

थोडक्यात बातम्या- 

“रोहित सरदाना खोटारडा होता, तो कुणाच्याही लक्षात राहणार नाही”

#सकारात्मक_बातमी | श्रीगोंद्यातील दोघा आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

“भारतासोबत अनेक विकसनशील देशांना लसनिर्मितीचा फॉर्म्यूला देऊ नये”, बिल गेट्स यांचं धक्कदायक वक्तव्य

इंदोरीकर महाराजांनी सांगितला कोरोनातून वाचण्याचा ‘हा’ खास उपाय

दिलदार गब्बर! मिशन ऑक्सिजनसाठी केलेली मदत ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More