…म्हणून या माणसाने चक्क कांगारुच्या कानाखाली वाजवली, कांगारुही हैराण, पाहा व्हिडीओ
आॅस्ट्रेलिया | आ्ॅस्ट्रेलिया हा कांगारुंचा देश म्हंटला जातो. या देशात कांगारुंची संख्या जास्त आहे. परंतु तुम्ही एखाद्या कांगारुला मानवाशी दोन हात करताना किंवा भांडताना पाहिलंय का? आ्ॅस्ट्रेलियातील जंगलात एका कांगारुने पाळीव कुत्र्याला पकडले होते. आपल्या पाळीव कुत्र्याला कांगारुच्या तावडीतून सोडवण्यासाठी मावकाने कांगारुशी दोन हात केल्याचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.
आ्ॅस्ट्रेलियातील जंगलात एका मोठ्या कांगारुने एका पाळीव कुत्र्याला आपल्या काखेत घट्ट पकडून ठेवले होते. कांगारु या कुत्र्याला इजादेखील करीत होता. हे त्या कुत्र्याच्या मालकाच्या लक्षात आल्यावर, त्याने कांगारुच्या दिशेने धाव घेतली.
मालकाने कांगारुला भीती दाखवत आपल्या कुत्र्याची सूटका करण्याचा प्रयत्न केला. कुत्र्याचा मालक आपल्या अंगावर धावून येत असल्याचे लक्षात येताच कांगारुनेही कुत्र्याला सोडले आणि मालकाशीच दोन हात करायला तयार झाला.
दरम्यान, कांगारु आणि मालकामध्ये खुन्नस देणं सुरु होतं. काही कळण्याच्या आत मालकाने कांगारुच्या तोंडावर एक जोरदार बुक्क मारला. त्यानंतर कांगारु गोंधळला. मालकाचे कुत्रे देखील तिथून पळून गेले. नंतर कांगारु जास्त चिडण्याच्या आत कुत्र्याच्या मालकानेही तेथून काढता पाय घेतला.
थोडक्यात बातम्या –
धक्कादायक!; अवघ्या चार ते पाच हजार रुपयात कोरोनाच्या बनावट अहवालाची विक्री
ममता बॅनर्जींवरील हल्ल्याला वेगळं वळण; प्रत्यक्षदर्शीनं केला ‘हा’ मोठा खुलासा
आता लग्नाला फक्त 20 लोकांनाच परवानगी; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध लागू!
महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धार्मिक ठिकाणी संचारबंदी; गुलाल उधळणे, पेढे वाटण्यास सक्त मनाई
शरद पवार-विश्वास नांगरे पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण; ‘या’ विषयावर झाली चर्चा?
Comments are closed.