संजय राठोडांसाठी जमलेल्या गर्दीत कोरोना; महंत कबीरदास यांच्यासह 19 जण पाॅझिटिव्ह
वाशिम | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत असणारे महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री हे 15 दिवस गायब होते. त्यानंतर त्यांनी 2 दिवसांपूर्वी पोहरादेवी येथे मोठे शक्ती प्रदर्शन केले. पोहरादेवीला झालेल्या गर्दीत मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आणि परिणामी आता महंतांसह 19 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
पोहरादेवी येथे जगदंबा देवीचे दर्शन घ्यायला आलेल्या संजय राठोड यांच्या 19 समर्थकांसह पोहरादेवीचे महंत कबीरदास महाराज आणि त्यांच्या कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सरकारकडून वारंवार सांगूनही मंत्रीच असे नियम मोडणार असतील आणि जनतेला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागणार असेल, तर या सर्वांना जबाबदार कोण? असा प्रश्न जनमानसात उपस्थित झाला आहे.
राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्बंध जनतेवर आणि एकूणच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर घातले आहेत. अशा परिस्थितीत एका मंत्र्यानेच शक्तीप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांचा आदेश धुडकावून लावला.
पोहरादेवी प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी वाशिम येथील प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. कोरोना संसर्गाचे नियम न पाळता लोक गर्दी करत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं असल्याचंही ते बोलले. असंच नियमांचं उल्लंघन होत राहीलं तर कोरोना आटोक्यात येणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षीतने शेअर केले ग्लॅमरस फोटो; फोटो पाहून चाहते झाले फिदा
तृप्ती देसाई यांचे संजय राठोड यांना खुले पत्र, वाचा जसेच्या तसे
‘PI लगडला चालवणारा बाप कोण ते आम्ही शोधून काढू’; चित्रा वाघ आक्रमक
“जो कोणी चुकला असेल त्याला क्षमा करणार नाही”
पूजा चव्हाणने उडी घेतलेल्या इमारतीची चित्रा वाघ यांनी केली पाहणी!
Comments are closed.