बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिलेसोबतचा व्हिडीओ!, आखाडा परिषद अध्यक्ष आत्महत्येबाबत धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri case) यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे संपुर्ण देशात चर्चेला उधाण आलं होतं. खुद्द पंतप्रधान मोदींनीही नरेंद्र गिरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूमागे कट असल्याचे आरोप देखील करण्यात आले होते. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महंत नरेंद्र गिरी मृत्यूपुर्वी शिष्य आनंद गिरी, पुजारी प्रसाद तिवारी आणि त्याचा मुलगा संदीप तिवारी यांच्यामुळे मानसिक तणावात असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. अपमान आणि बदनामी टाळण्यासाठी महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं सीबीआयने आरोपपत्रामध्ये सांगितलं आहे. सीबीआयच्या तपासामध्ये एक व्हिडीओ हाती लागला आहे.

महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांनी एक एडिटेड व्हिडीओ असल्याचं नरेंद्र गिरी यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. आनंद गिरी यांच्याकडे असलेल्या व्हिडीओमध्ये नरेंद्र गिरी महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आहेत. या व्हिडीओ एडिटेड असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. आनंद गिरी हा व्हिडीओ व्हायरल करण्याच्या तयारीत असल्याचं आरोपपत्रातून म्हटलं आहे.

दरम्यान, आनंद गिरी, पुजारी प्रसाद तिवारी आणि त्याचा मुलगा संदीप तिवारी यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नरेंद्र गिरी यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी या तिघांना अटक केली होती.

थोेडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल?, ‘या’ दोन नावांची चर्चा

“राज्यातील रस्ते कतरिनाच्या गालासारखे गुळगुळीत असावेत”; राज्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

“मी डंके की चोटपर सांगतोय, शरद पवारांनी विश्वासघात केला”

भारी काम झालं! रेशनधारक कुटुंबांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

भर पत्रकार परिषदेत अनिल परब यांचा पडळकरांना टोला, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More