महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा सरकार करणार गौरव

मुुंबई |आपल्या अतुलनीय शौर्याच्या बळावर देश संरक्षणात महार बटालियनच्या सैनिकांचं बहुमुल्य योगदान आहे. त्यामुळे अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा गौरव सरकार करणार आहे.

मुंबईच्या गेट वे आॅफ इंडिया येथे 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि इतर मान्यवर मंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. 

महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युद्धकाळात आणि शांततेच्या काळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात किर्ती मिळवली आहे.

दरम्यान, इतिहासात महार रेजिमेंटच्या सुपुत्रांचा सन्मान करणारे महाराष्ट्र शासन पहिले शासन आहे, असं सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

-काॅमेडी किंग कपिल शर्मा चढला बोहल्यावर

-काँग्रेस हाच भाजपला पर्याय- शरद पवार

-शुभमंगल सावधान… ईशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबंधनात

-शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय होणार?; सपाटून मार खाल्ल्यानंतर मोदींचा कमबॅक फॉर्म्युला

-भावुक झाले शिवराज सिंह; म्हणाले काही चूक झाली असेल तर माफ करा