महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंनी मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले…

मुंबई | काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सध्याची वेळ ही राजकारण करण्याची नाही तर संकटाशी लढण्याची आहे, असं म्हटलं होतं. तसेच गडकरी यांनी राज्यातील भाजप नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या होत्या. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार मानले आहेत.

मला नितीन गडकरींचे मनापासून आभार मानायचे आहेत. सध्याच्या काळात जी गोष्ट महत्वाची आहे, तीच गोष्ट त्यांनी सांगितलं आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, आणि ते करण्याल मला रसही नाही. सरकार येतील-जातील. आज आम्ही सत्तापक्षात आहोत, उद्या कोणीतरी दुसरं असेल. पण सध्या आपापसताले मतभेद विसरुन एकत्र येऊन लढण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

काही जणांकडून आजही राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय, पण मला त्यात अजिबात इच्छा नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी कोरोनामुळे मृत्यूमुखी पावलेल्या दोन पोलिस कॉन्स्टेबलबद्दलही शोक व्यक्त केला. पोलिस कर्मचारी आपलं घरदार सर्व सोडून या लढाईत मैदानात उतरला आहे. त्यामुळे प्रत्येक बाबतीत पोलिसांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या वर्दीतल्या माणसाला समजून घ्या, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जॉंग उनचा खरंच मृत्यू झाला आहे का?

…तर ‘या’ महिलेकडे येऊ शकते उत्तर कोरियाची जबाबदारी; कोण आहे ही महिला?

महत्वाच्या बातम्या-

कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील आणखी एका हवालदाराचा मृत्यू

“गुणाकारात वाढणाऱ्या कोरोनाच्या संकटावर मात करण्यात आपण यशस्वी ठरलो”

पुण्यातील या महत्त्वाच्या उड्डाणपुलाबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या