केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील ‘हा’ रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग
नवी दिल्ली | महाराष्ट्रात महाविकास आघाडीची (MVA) सत्ता गेल्यावर भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आलं. त्यामुळे आता केंद्रातील भाजप सरकार सुद्धा कामाला लागले आहे. महाराष्ट्रात भाजपचे हात बळकट करण्यासाठी यापुढे केंद्र सुद्धा महाराष्ट्राला कशाची कमी पडू देणार नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रातील महामार्गांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग (Ministry of Road Transport and Highways of India) करण्याचा निर्णय घेतला आहे.
काल रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी तशी घोषणा केली. आता केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्राती खेड – भीमाशंकर (Khed-Bhimashankar) या राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे आता बनकर फाटा – तळेघर या मार्गालासुद्धा आता केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे.
या मार्गाच्या बांधकाम आणि नुतनीकरण विषयक कामांचे नियोजन करण्यात येणार आहे. लवकरात लवकर या महामार्गाचे काम पू्र्ण करुन तो नागरीकांना सूपुर्द केला जाणार आहे. तशा प्रकारची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रस्ते वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महामार्गाच्या निर्मीतीसाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं गडकरींनी ट्विट करत म्हंटलंय.
पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैैकी एक असलेले एक भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाला भेट देण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. त्यांचा प्रवास आणि देवदर्शन सुरळीत आणि सुरक्षीत होण्यासाठी खे़ड-भीमाशंकरला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच भीमाशंकर आणि खेड परिसरातील शेतमाल महानगरांना निर्यात करता येईल आणि शैक्षणिक आणि औद्योगिक विकास होईल हा देखील त्यामागचा उद्देश आहे, असं यावेळी गडकरी म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
अमित शहांचे सहकारी सल्ला घेण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला; खुद्द पवारांनी दिली माहिती
उद्धव ठाकरेंना एकाच दिवशी सलग पाच धक्के!
सुष्मिताबाबत एक्स बाँयफ्रेंड विक्रम भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले…
अभिनेता महेश बाबूनंतर अल्लू अर्जुनचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…
मोठी बातमी! नाही नाही म्हणत ‘हा’ बडा नेताही शिंदे गटात सहभागी
Comments are closed.