बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वराज्याची राजधानी ‘रायगड’साठी राज्य सरकारची मोठी घोषणा

मुंबई |  आज विधिमंडळात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात स्वराज्याची राजधानी ‘रायगड’साठी राज्य सरकारनं मोठं आणि महत्वाचं पाऊल उचललेलं आहे.

‘रायगड’ किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने 606 कोटींचा निधी मंजूर केला आहे. रायगडच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याची आमची तयारी असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

शिवछत्रपती प्रतिष्ठान आंबेगाव (जि. पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ओजस्वी जीवनावरील शिवसृष्टीची निर्मिती होत आहे. या प्रकल्पासाठी 2019-20 या आर्थिक वर्षात 50 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असंही मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, 606 कोटींच्या मंजूर निधीपैकी 59 कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली.

महत्वाच्या बातम्या

-अभिनेता संजय दत्तचा पहिला मराठी सिनेमा, पाहा टिझर

-मुनगंटीवार आणि केसरकरांच्या पेटाऱ्यात दडलंय काय?? आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होणार

-मी पाक क्रिकेट संघाची आई नाही; सानिया आणि वीणा मलिकची ट्वीटरवर जुंपली

-पुणेकरांसाठी खुशखबर; हेल्मेटसक्तीची कारवाई थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

-जुन्या विनोदाने शिक्षणाची घाण केली; बच्चू कडूंचा तावडेंवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More