बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून महाराष्ट्रातील भाजपचा सहकारावर राग असणं स्वाभाविक”

मुंबई | काही दिवसांपुर्वी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी 43 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रीमंडळ विस्तारात सहकारमंत्री पद निर्माण करण्याच आलं. गृहमंत्री अमित शहा देशाचे पहिले सहकारमंत्री बनले. यावरच आता शिवसेनेकडून नव्या सहकारमंत्र्यांचे स्वागत करण्यात आलं आहे. सामना अग्रलेखाच्या माध्यमातून शिवसेनेने या नवीन सहकारमंत्र्यांच स्वागत करत महाराष्ट्र भाजपवर टीका देखील केली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सहकार क्षेत्राची सूत्रे हाती घेतल्याने कोणाचा थरथराट वगैरे होण्याचे कारण नाही. अमित शहा हे सहकार चळवळीतील कार्यकर्ते आहेत. नव्या सहकार मंत्र्यांचे स्वागत करायला काय हरकत आहे?, अशी भूमिका शिवसेनेनं अग्रलेखाच्या माध्यमातून मांडली आहे. तसेच, राजकारणात व सहकारात बरे-वाईट, खरे-खोटे, नैतिक-अनैतिक असे काही भेदभाव सध्या उरले नाहीत. सर्व काही सोयीनुसार घडत असते, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

सहकारमंत्री राज्यातील सहकार क्षेत्रावरील काँग्रेस, राष्ट्रवादीचे सहकारातील जे प्रमुख लोक आहेत त्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावतील. त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजप सरकारची स्थापना सहकारातून करतील असं जे बोलले जात आहे, ते शहा यांची बदनामी करणारे आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता हातची गेली ती सहकार क्षेत्रातील दिग्गज नेत्यांमुळेच. तेव्हा महाराष्ट्रातील भाजपचा सहकारावर राग असणं स्वाभाविक आहे, असं मार्मिक मत शिवसेनेनं मांडलं आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात हे सहकाराचे दोन बालेकिल्ले आहेत, अमित शहा हे मूळचे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत. नंतर ते राजकारणात आले. सहकार क्षेत्रातील जाण त्यांना असल्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली असावी असं वाटतं, अशी पुरवणी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आता दिली आहे. त्यात काही चुकीचे आहे असं वाटत नाही, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“छत्रपतींच्या गादीला डावलण्याचं काम करून भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”

“लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात”

“कितीही बंदी घाला, मुले जन्माला घालण्यापासून कुणी रोखू शकणार नाही”

राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या ‘त्या’ वक्तव्याला शरद पवारांचा पाठिंबा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More