निवडणुकीत उतरलेल्या 19 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे, सर्वाधिक गुन्हेगार भाजपात?

Maharashtra Assembly Election 2024 candidates data

Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचलाय. उद्या 20 नोव्हेंबररोजी मतदार पार पडेल. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजेच 23 नोव्हेंबररोजी निकाल जाहीर होईल. राज्यात यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगत आहे. काल प्रचारसभेचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे राज्यभरात नेते-मंडळींच्या सभा आणि रॅली गाजल्या. (Maharashtra Assembly Election 2024 )

यंदा राज्यातील 288 मतदारसंघात तब्बल 4136 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांपैकी तब्बल 19 टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलीये. तर, सर्वाधिक गुन्हेगार असलेल्या पक्षात भाजपा आघाडीवर असल्याचंही समोर आलंय. नुकताच एक ताजा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात हा दावा करण्यात आला आहे.

288 मतदारसंघात तब्बल 4136 उमेदवार रिंगणात

एका प्रसिद्ध संस्थेने राज्यातील निवडणुकांबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये या अहवालात काय दावा करण्यात आलाय, त्याबाबत सांगितले आहे. त्यानुसार, या विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघात 204 महिलां

सह 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (Maharashtra Assembly Election 2024 )

याचबरोबर राष्ट्रीय पक्षांचे 490, प्रादेशिक पक्षांचे 496 आणि 2 हजार 87 अपक्ष उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यातील 2201 उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 29 टक्के उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर 19 टक्के उमेदवारांविरोधात महिलांवर अत्याचार, हत्या, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सर्वाधिक गुन्हेगार उमेदवार कोणत्या पक्षात?

तसेच 47 टक्के उमेदवाराचे शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत झाले आहे. तर, 47 टक्के उमेदवार पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. तसेच 10 उमेदवार हे अशिक्षित आहेत. या अहवालानुसार, भाजपच्या सर्वाधिक 68 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर ठाकरे गटाचा नंबर लागतो.

शिवसेना ठाकरे गट 66 टक्के, शिवसेना शिंदे गट 64 टक्के, राष्ट्रवादी शरद पवार गट 61 टक्के, काँग्रेस 58 टक्के आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 57 उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. एका प्रसिद्ध अहवालात हा दावा करण्यात आला आहे. तसेच, काही मीडिया रिपोर्टमध्येही याबाबत माहिती देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Election 2024 )

News Title :  Maharashtra Assembly Election 2024 candidates data

महत्वाच्या बातम्या –

प्रचारसभा थंड होताच ‘खिशे’ झाले गरम, कोकणात मध्यरात्री पडला पैशांचा पाऊस?

अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे स्टंटबाजी, भाजपने ‘ते’ आरोप फेटाळले

अनिल देशमुखांवर हल्ला करणाऱ्यांकडून ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणा?, नेमकं काय घडलं?

प्रेमविवाहाला संमती ते नोकरीच्या नव्या संधी.. आज ‘या’ राशींना ग्रहमान देतील साथ!

राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याने राजकीय संन्यासाची केली घोषणा!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .