Maharashtra Assembly Election 2024 | महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान होणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 288 जागांवर एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य हे आज 20 नोव्हेंबर रोजी मतपेटीत बंद होणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024 )
राज्यात सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 23 नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार असून त्यादिवशी राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल. यंदा महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत आहे.
महाविकास आघाडी vs महायुती
लोकसभेत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्याच कामगिरीची अपेक्षा आता विधानसभेतही मविआला असणार आहे. तर, महायुतीने देखील लोकसभेतील पराभवाचा चांगलाच धडा घेतला आहे. यंदा अनेक जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होणार आहे.
महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे प्रमुख पक्ष आहेत. या दोन्ही आघाड्यांकडून आपले उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. आज या उमेदवारांचे भवितव्य हे मतपेटीत बंद होणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024 )
कोणत्या पक्षाने किती उमेदवार दिले?
महायुती
भाजप – 149 जागा
एकनाथ शिंदे यांची शिवसेना – 81 जागा
अजित पवार राष्ट्रवादी – 59 जागा (Maharashtra Assembly Election 2024 )
महाविकास आघाडी
कॉँग्रेस – 101 जागा
शरद पवार राष्ट्रवादी – 86 जागा
उद्धव ठाकरे शिवसेना – 95 जागा
News Title – Maharashtra Assembly Election 2024
महत्त्वाच्या बातम्या-
स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींना मिळणार भरभरून यश, मोठं पदही मिळणार!
‘मतदानरुपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा’; संभाजी पाटील निलंगेकर यांचं आवाहन
“स्क्रिनवर आपले कपडे…”, ऐश्वर्या रायकडून ‘त्या’ गोष्टींचा खुलासा!
भाजपकडून विनोद तावडेंचा गेम?; टीप कोणी दिली?, हितेंद्र ठाकुरांचा गौप्यस्फोट
खळबळजनक! विनोद तावडेंना जिथे पकडलं, त्याच हाॅटेलच्या एका खोलीत 7 महिला…