Maharashtra Assembly Election | राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त 5 दिवस शिल्लक आहेत. येत्या 20 नोव्हेंबररोजी मतदार पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवरच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळांना 3 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस सुट्टी असणार आहे. (Maharashtra Assembly Election)
शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जातंय. निवडणूक असल्याने राज्यभरातील अनेक शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवले जाणार आहे. याच कारणामुळे 18,19 आणि 20 नोव्हेंबररोजी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती काही मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
18, 19 व 20 नोव्हेंबररोजी शाळांना असणार सुट्ट्या
शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने आयुक्तांना दिले आहेत. 20 नोव्हेंबरला मतदानसाठी शाळांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. मतदानाची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेते. त्यामुळेच सलग तीन दिवस शाळकरी विद्यार्थ्यांना सुट्ट्या असणार आहेत. (Maharashtra Assembly Election)
ज्या शाळांकडून सुट्टी जाहीर केली जाणार त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना 18,19 आणि 20 नोव्हेंबरची सुट्टी तर मिळेलच, यासोबत 17 नोव्हेंबरला रविवार असल्याने सलग चार सुट्ट्यांचा आनंद शालेय विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
शिक्षण आयुक्तांनी विनंती पत्रात काय म्हटलंय?
“उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 18,19 आणि 20 नोव्हेंबर, 2024 रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, ही विनंती”, असं शिक्षण आयुक्तांनी पत्रात म्हटलं आहे. (Maharashtra Assembly Election)
News Title – Maharashtra Assembly Election 4 days school holidays
महत्त्वाच्या बातम्या-
खरेदीची करा घाई! सोनं झालं स्वस्त, सराफा बाजारात काय आहेत सध्या किंमती?
दिशा सालियन प्रकरणी पुन्हा चौकशी लावणार, ‘या’ नेत्याचा आदित्य ठाकरेंना इशारा
आज कार्तिक पौर्णिमेला ‘या’ राशींवर राहणार विष्णुदेव व लक्ष्मीची कृपा!
संभाजी पाटील निलंगेकरांचा वंचित बहुजन आघाडीला झटका!
ऐश्वर्याला धोका दिल्याच्या चर्चांदरम्यान अभिषेकचं मोठं वक्तव्य, म्हणाला…