मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी जाहीर केलं बड्या नेत्याचं नाव

Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. 20 नोव्हेंबर 2024 ला निवडणूक होणार आहे तर 23 नोव्हेंबर 2024 ला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. अशातच आता जागावाटपावरून देखील गुऱ्हाळ सुरु आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदावरून एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शरद पवारांचं मोठं विधान :

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून चढाओढ सुरु असल्याचं दिसत आहे. अशातच आता शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल याची अप्रत्यक्षपणे घोषणा देखील केली आहे. मात्र शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून एका बड्या नेत्याचे नाव जाहीर केले आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. जयंत पाटील यांनी उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घ्यावी असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगली येथील सांगता सभेत शरद पवार हे बोलत होते.

Maharashtra l मुख्यमंत्रिपदाचे दावेदार कोण? :

याशिवाय उद्याचा महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि प्रगती घडवण्यासाठी मोलाची कामगिरी देखील याच परिसरातून होणार आहे असं देखील शरद पवारांनी सांगली येथील सभेत जाहीर केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून जयंत पाटील हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.

तसेच सांगली येथील शिवस्वराज्य सांगता सभेच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी देखील जयंत पाटील मुख्यमंत्री होणार अशी घोषणाबाजी केली आहे. मात्र त्यावरुन जयंत पाटील यांनी देखील मिश्किल टोलेबाजी केली आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, घोषणा देऊन कोणी मुख्यमंत्री होत नाही तर त्याला खूप उठाबशा काढाव्या लागतात असा टोला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.

News Title : Maharashtra Assembly Elections 2024 

महत्वाच्या बातम्या –

पुण्यात बड्या व्यावसायिकाच्या घरावर ईडीचा छापा; 85 कोटींची मालमत्ता जप्त

सोन्याची जोरदार आघाडी, 10 ग्रॅमसाठी आता मोजा ‘इतके’ रुपये

SBI ने ग्राहकांना दिलं दिवाळी गिफ्ट! लोन झालं स्वस्त

‘सरन्यायाधीश’ पदाच्या दावेदाराचं नाव समोर! डी. वाय. चंद्रचूड यांनी केली शिफारस

मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर!