महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?, पाहा संपूर्ण आकडेवारी

Maharashtra Assembly Final Result 2024 | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर काही एक्झिट पोल्समधून राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली होती. त्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार, असंही म्हटलं गेलं. मात्र, काल 23 नोव्हेंबररोजी झालेल्या प्रत्यक्ष मतमोजणीत अत्यंत धक्कादायक निकाल लागले.  (Maharashtra Assembly Final Result 2024)

अंतिम निकालात एकूण 288 जागांपैकी 234 जागांवर महायुतीने बाजी मारली. तर, महाविकास आघाडीला केवळ 50 जागा जिंकता आल्या.त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. लवकरच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे.

महायुतीमध्ये भाजपाला 132, शिवसेनेला (शिंदे) 57, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) 41 जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) 20, काँग्रेसला 16 व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 10 जागा जिंकल्या आहेत. भाजपाला बहुमतासाठी केवळ 13 आमदारच कमी पडत आहेत. तर, यावेळी राज्यात पहिल्यांदाच विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना कामकाज करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra Assembly Final Result 2024)

पक्षनिहाय आकडेवारी

1 भारतीय जनता पार्टी – भाजपा  132
2 शिवसेना- शिंदे गट 57 जागा
3 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)- 41
4 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- 20
5 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस- 16
6 राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार – 10
7 समाजवादी पक्ष – सपा 2
8 जन सुराज्य शक्ती – 2 २
9 राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष- 1
10 राष्ट्रीय समाज पक्ष – 1
11 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन- 1
12 भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) – 1
13 भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष- 1
14 राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
15 अपक्ष – 2  (Maharashtra Assembly Final Result 2024)

News Title – Maharashtra Assembly Final Result 2024

महत्त्वाच्या बातम्या-

आज ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ, देवी लक्ष्मी आर्थिक अडचणी करणार दूर!

मोठी बातमी! अटीतटीच्या लढतीमध्ये रोहित पवार विजयी, राम शिंदेंचा ‘इतक्या’ मतांनी पराभव

पराभवानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘या’ कारणांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला!

‘बाप बाप होता है’; विजयानंतर धर्मरावबाबा आत्रामांनी लेकीला सुनावलं