Maharashtra Assembly Monsoon Budget | यंदाचा अर्थसंकल्प हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आहे. यामुळे आता आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्य सरकार कोणत्या सोयीसुविधा राज्याच्या जनतेला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देतील हे पाहणं गरजेचं असणार आहे. हा अर्थसंकल्प जनतेचं मन जिंकणारा असेल तर याच चित्र हे येत्या विधानसभेत दिसेल. या अर्थसंकल्पात महिला आणि तरूणांना मिळणाऱ्या संधीबाबत महत्त्वाची अपडेट दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. (Maharashtra Assembly Monsoon Budget)
बलुतेदार, वंचित, महिला, तरूणांना अर्थसंकल्पातून फायदा होण्याची शक्यता :
अर्थसंकल्पात नेमकं काय असणार आहे. याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बलुतेदार, वंचित, महिला, तरूण यांना या अर्थसंकल्पातून फायदा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, महिलांना वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याचीही तरदूत केली जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Monsoon Budget)
यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना वर्षातून तीन महिने मोफत सिलिंडर देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. असे असताना राज्य संकल्पाच्या या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. यावेळी सरकारने शेतकरी, महिला आणि तरूणांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी सरकार अर्थसंकल्पातून मोठं पाऊल उचलणार आहे.
तरूणांना भत्ता मिळण्याची शक्यता :
तसेच उत्तर प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना राबवण्यात आली. त्यानंतर आता ही योजना महाराष्ट्रात देखील राबण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अर्थिक दुर्बल महिलांना महिन्याला आर्थिक स्वरूपात मदत व्हावी यासाठी ही योजना राबवली जाण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Monsoon Budget). या अर्थसंकल्पात राज्य सरकार हे शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची तरदूत करण्याची शक्यता आहे. लघु आणि मध्यम शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी मोफत वीज दिली जाईल.
तसेच तरूणांना देखील भत्ता मिळणार असल्याची शक्यता या अर्थसंकल्पातून मांडली जाऊ शकते. बारावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याला 7 हजार रूपये महिलांना भत्ता दिला जाणार. आयटीआय, डिप्लोमा धारकांना भत्ता दिला जाण्याची शक्यता आहे. पदवी धारकांना मासिक 10 हजार रूपये सहा महिन्यांसाठी दिली जाऊ शकते, अशी शक्यता नोंदवण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Monsoon Budget)
News Title – Maharashtra Assembly Monsoon Budget News Update
महत्त्वाच्या बातम्या
बीड कथित ऑडिओ प्रकरणी ‘या’ दिग्गज नेत्यावर गुन्हा दाखल
चांदीचे मंदिर, सोन्याच्या मूर्ती! अनंत व राधिकाची लग्नपत्रिका एकदा पाहाच
पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई; ‘या’ भागातील पब, बारवर फिरवला बुलडोझर
टीम इंडियाचा दणदणीत विजय! इंग्लंडच्या पराभवाची ही आहेत 3 कारणे