Top News पुणे महाराष्ट्र मुंबई राजकारण

विधानसभा अध्यक्षपद पुण्याला मिळणार?; ‘या’ नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

मुंबई | महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन विधानसभा अध्यक्ष कोण होणार?, यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. नवीन अध्यक्ष हा तिन्ही पक्षाच्या सहमतीने होईल, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केल्यानंतर तर या वादाने चांगलाच पेट घेतला होता.

नवीन विधानसभा अध्यक्षांच्या नावाचा विचार करताना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर होतं, मात्र त्यांच्या नावाला शरद पवारांचा विरोध असल्याची बातमी माध्यमांमध्ये आली होती, त्यानंतर नितीन राऊत यांचं नाव चर्चेत आलं होतं.

नितीन राऊत यांच्या नावालाही शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचा विरोध असल्याचं वृत्त आहे, त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष कोण होणार?, हा मुद्दा कळीचा बनला आहे. एका नेत्याने तर पुण्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव पुढं केलं आहे. ह्या नावाला सर्वांची पसंती असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात संग्राम थोपटे यांना स्थान मिळालेलं नव्हतं. पुण्यातून काँग्रेस नष्ट होत असतानाही जिल्ह्यात काँग्रेसचं नाव जिवंत ठेवण्याचं काम थोपटे यांनी केलेलं आहे. तरीही मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनची तोडफोड केली होती. इतकं सारं घडल्यानंतरही संग्राम थोपटे यांच्या गळ्यात विधानसभा अध्यक्षपदाची माळ पडते का? हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

थोडक्यात बातम्या –

एक नवरा, एक प्रियकर… आणखीही अनेकांसोबत संबंध, शेवट काळजाचा थरकाप उडवणारा

ती पुन्हा येतेय… जावा पुन्हा लॉन्च करतेय आपली खतरनाक बाईक!

‘हा’ आईपीओ मंगळवारी बाजारात धडकणार; गुंतवणुकदांरांसाठी मोठी संधी

अक्षय कुमारचं टेन्शन वाढलं, ‘अशा’प्रकारे बसू शकतो मोठा फटका

राज्य सरकारचा फ्लिपकार्टसोबत करार, तुम्हालाही होऊ शकतो फायदा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या