५ जूनला महाराष्ट्र बंदच, नाशिकमधील बैठकीत शेतकऱ्यांचा निर्णय

नाशिक | पुणतांब्यातून शेतकरी संपाचा केंद्रबिंदू नाशिकला गेला असला तरी ५ जूनचा महाराष्ट्र बंद कायम ठेवण्यात आलाय. नाशिकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

महाराष्ट्र बंदमध्ये अडत व्यापारी, वाहतूकदार आणि नागरिकांनीही सहभागी व्हावं, असंही आवाहन यावेळी करण्यात आलं. या बैठकीला बुधाजीराव मुळीक, अजित नवले, रामचंद्रबापू पाटील आणि रघुनाथ दादा पाटील यांनी हजेरी लावली.ो