महाराष्ट्र बंद – वाचा क्षणा-क्षणाचे अपडेट इथे…

मुंबई | भीमा कोरेगावमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आलाय. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा केली होती. 

लाईव्ह अपडेट-

 

-नागपुरात जळके टायर रस्त्यावर टाकून रास्तारोको करण्याचा प्रयत्न, शताब्दी चौक आणि जयताळा परिसरातील घटना

-पुण्याच्या औंधमध्येही रास्तारोको

-मुंबईच्या वरळी नाक्यावर आंदोलकांची घोषणाबाजी

– नालासोपारा स्टेशनवर ट्रॅकवर उतरुन आंदोलकांचा गोंधळ, आंदोलकांना हटवून रेल्वे सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु

-सोलापुरात मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली, जमावबंदीचे आदेश लागू

-मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजची अकरावीची कला, विज्ञान शाखेची आजची परीक्षा रद्द

-शासकीय सुट्टी नसल्याची मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

– औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद. एसटी सेवाही बंद

 –ठाण्यात जमावबंदी लागू

कल्याणमधील रिक्षाचालक-मालक संघटनाही संपात सहभागी. डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर रिक्षा बंद

लाल बावटा रिक्षा संघटनेचा संपात सहभागी होण्याचा निर्णय. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील सव्वा लाख रिक्षा संपात सहभागी