मुंबई | मराठा आरक्षणासह मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ठाणे आणि नवी मुंबई वगळून उर्वरित राज्यात महाराष्ट्र बंद राहणार आहे.
नागरिकाना वारंवार वेठीस धरणं योग्य नसल्याचं सांगत ठाणे आणि नवी मुंबईच्या मराठा आंदोलकांनी बंद न करण्याचा निर्णय घेतलाय. त्याऐवजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
दरम्यान, मराठा समाजाला दिलेली आश्वासनं सरकारनं पाळली नाहीत. त्यामुळे मूक मोर्चानंतर मराठा समाजाने ठोक मोर्चे काढले. या दरम्यान अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आज महाराष्ट्र बंदची हाक देत मराठा समाजाने आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-नंदुरबारला निघालोय, बघू कुणात हिंमत आहे मराठा आंदोलन रोखायची?- हर्षवर्धन जाधव
-सुधीर गाडगीळांमुळेच सांगलीत आम्हाला भरघोस मतदान झालं- चंद्रकांत पाटील
-लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना अशोक गायकवाड देणार आव्हान?
-उद्या ‘महाराष्ट्र बंद’च राहणार; मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय
-मेधा कुलकर्णींच्या वक्तव्याचा निषेध करत मराठा मोर्चेकऱ्यांकडून अनोखा स्टंट!