पुणे | मराठा आंदोलनकर्त्यांनी 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला होता. या आंदोलनातील एका व्हीडिओची सोशल मीडियात आता चांगलीच चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवले होते. याच रस्त्यावरुन एक रुग्णवाहिका आली. आंदोलनकर्त्यांनी तात्काळ आग विझवली आणि रुग्णवाहिकेला जायला जागा दिली.
ही घटना परभणीतील असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. मात्र रुग्णवाहिकेवर पुण्याजवळच्या देवाच्या आळंदीचं नाव पहायला मिळतंय, याशिवाय रुग्णवाहिकेचा नंबरही MH-14 आहे.