बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काकावर पुतण्या भारी! ‘या’ निवडणुकीची राज्यभर एकच चर्चा

बीड | काका पुतण्याचं राजकारण महाराष्ट्रासाठी नविन नाही. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काका पुतण्याचं राजकारणाची बरीच उदाहरणं पहायला मिळतात. अशातच सध्या राज्यात काका पुतण्याच्या राजकारणाची एकच चर्चा सुरू आहे. बीडमधील (Beed) झालेल्या पोटनिवडणुकीत पुतण्याने काकावर मात केली आहे.

नवगण राजुरी (Navgan Rajuri) येथील ग्रामपंचायत मधील एका सदस्याचं निधन झाल्यानं या जागेसाठी पोटनिवडणुक लागली होती. या निवडणुकीत शिवसेना नेते काका जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एकमेकांविरूद्द रणशिंग फुकलं होतं. या दोघांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली होती. जोरदार रंगलेल्या या निवडणुकीत अखेर पुतण्याने बाजी मारली आहे.

पोटनिवडणुकीच्या जोरदार लढतीनंतर बुधवारी मतमोजणी झाली. राष्ट्रवादीचे उमेदवार वैशाली बहीर यांचा तब्बल 365 मतांनी विजय झाला आहे. तर शिवसेनेच्या उमेदवारांना 123 मत मिळाली आहे. सध्या या निवडणुकीची बीडमध्ये एकच चर्चा आहे.

दरम्यान, राजुरी ग्रामपंचायतीवर आमदार संदिप क्षीरसागर यांच्या पॅनलवर ताबा होता. आता पुन्हा संदिप क्षीरसागर यांनी स्वत:च्या काकांनाच धोबीपछाड देत मोठा विजय मिळवला आहे.

थोडक्यात बातम्या-

“भास्कर जाधवांनी सभागृहात नौटंकी करण्यापेक्षा…”

‘ही महाराष्ट्राची परंपरा नाही’; सभागृहातच अजित पवारांनी भास्कर जाधवांना सुनावलं

मोदींची नक्कल, भाजपचा राडा अन् भास्कर जाधवांनी मागितली बिनशर्त माफी

“भाजप अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?”

“रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यायला काही हरकत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More