ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
मुंबई | ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून केली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण निवड समितीची बैठक पार पडली.
आशा भोसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आशाताईंचे आभार मानले आहेत. राज्य सरकारकडून 1996मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला होता. दुसरा पुरस्कार 1997मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना देण्यात आला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणाऱ्या आशा भोसले या मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत.
आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आशा भोसले यांचं कौतुक आणि अभिनंदन केलं आहे .
दरम्यान, आशाताईंनी अतिशय कष्ट घेऊन संगीत क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि या क्षेत्रात भरीव योगदान दिलं. त्यांना महाराष्ट्र सरकारने सन्मानित केलं ही अतिशय आनंदाची बाब आहे. मी आशाताईंचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो आणि राज्य सरकारला धन्यवाद देतो, असं शरद पवार म्हणाले.
ख्यातनाम गायिका आशा भोसले जी यांना २०२० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. निवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.@ashabhosle
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 25, 2021
थोडक्यात बातम्या-
राज्याच्या मुख्य सचिवांचा फोन टॅपिंग प्रकरणावरील अहवाल सादर, रश्मी शुक्लांवर कारवाई होणार???
जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी
मंत्री असावा तर असा! जितेंद्र आव्हाडांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय
…तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही राजीनामा घ्यावा- नाना पटोले
‘रश्मी शुक्ला यांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी सांगितलं का?’; यड्रावकरांनी सांगितली अंदर की बात
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.