Maharashtra Big Projects | मराठवाडा, विदर्भ, पुणे आणि पनवेल येथे एक लाख 17 हजार 220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (5 सप्टेंबर) झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता दिली. (Maharashtra Big Projects)
या प्रकल्पांमुळे सुमारे 29 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या मोठ्या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचे देखील शिंदे यांनी म्हटले.
‘या’ 4 प्रकल्पांना मान्यता
सेमीकंडक्टर निर्मितीसाठी पनवेलमध्ये ‘टॉवर सेमीकंडक्टर कंपनी’ व ‘अदानी समूहा’चा संयुक्त प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 58 हजार 763 कोटी तर दुसऱ्या टप्यात 25 हजार 184 कोटी अशी एकूण 83 हजार 947 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामुळे 15 हजार रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा आहे.(Maharashtra Big Projects)
पुण्यात स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया कंपनीचा एकात्मिक प्रकल्प सुरु होणार आहे. या प्रकल्पामध्ये 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल 1000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
29 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार
छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा-किर्लोस्कर मोटार कंपनीचा इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 21 हजार 763 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यामुळे 12 हजार नोकऱ्या उपलब्ध होतील, असा अंदाज आहे.(Maharashtra Big Projects)
राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी आज झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता दिली. pic.twitter.com/7DRl60CGdL
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 5, 2024
चौथा मोठा प्रकल्प हा अमरावती येथे होणार आहे. अमरावतीमधील नांदगाव पेठ अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीमध्ये रेमंड लक्झरी कॉटन्सच्या या प्रकल्पात स्पिनिंग, यार्न डाइंग, व्हिव्हींग ज्यूट, व्हिव्हींग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटनचे उत्पादन होणार आहे. यामध्ये 188 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. या माध्यमातून साधारण 550 थेट नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
News Title : Maharashtra Big Projects 29 thousand jobs will be available
महत्वाच्या बातम्या-
आज हरितालिकेचा व्रत, जाणून घ्या पूजेची योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त
आज हरतालिका व्रत, ‘या’ 5 राशींवर राहील शिव-पार्वतीची कृपा
वनराज आंदेकरच्या मृत्यूनंतर वडिलांनी घेतली शपथ, म्हणाले ‘आता मी…’
इंदापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ, दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्याने खळबळ
मोठी बातमी! जयदीप आपटेला ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी