नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आता महाराष्ट्रातून मदत मिळणार आहे. आजपासून महाराष्ट्रातील भाजपचे नेते दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार असल्याची माहिती मिळतेय.
महाराष्ट्रातील जवळपास २५ नेत्यांवर दिल्लीतील प्रचाराची जबाबदारी दिल्याची माहिती समोर येतेय. प्रामुख्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे आजच प्रचारासाठी दिल्लीत दाखल होणार आहेत तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार आशिष शेलार हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रचार करणार आहेत.
दिल्लीत एकाच टप्प्यात सर्व 70 जागांसाठी मतदान होणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वातील आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीत पाच वर्ष पूर्णपणे सत्ता राखली आहे. 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
दिल्लीत 15 फेब्रुवारीपासून केंद्रीय माध्यमिक शैक्षणिक बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वीच दिल्ली विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम आटोपता घेतल्याचं कळतंय.
ट्रेंडिंग बातम्या-
“शिवसेना पक्ष लिहून चाटून सत्तेत आला यात काही नवल नाही”
हातात बूट घेऊन देवेंद्र फडणवीस स्टेजवर, रूपाली चाकणकर म्हणतात…
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा रद्द
पडद्यावरच्या खलनायकानं जिंकली जनतेची मनं
“अशोक चव्हाण यांच्या बोलण्याची पद्धत चुकीची”
Comments are closed.