Maharashtra Board Result 2024 | फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. आता विद्यार्थ्यांना निकाल कधी लागणार, याची प्रतिक्षा लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर केले जातात.
आता विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यात आला की, मेच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहिर केले जाऊ शकतात.
त्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे. बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल जाहीर होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप निकालाबद्दल कोणतेच अपडेट देण्यात आले नाहीत. मात्र, या आठवड्यात निकाल लागणार असल्याची चर्चा आहे.
विद्यार्थ्यांनी ‘या’ लिंकवर निकाल पाहावा
-mahresult.nic.in
-mahahsscboard.in
-hsc.mahresults.org.in
https://www.digilocker.gov.in/
या वेबसाइटवर भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना ‘MAHA SSC Result 2024’ किंवा ‘MAHA HSC Result 2024’ हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करावे. यानंतर हॉलतिकीटवरचा क्रमांक आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.यानंतर निकाल तुमच्या समोर दिसेल. निकालाची एक कॉपी डाऊनलोट करून तुमच्या जवळ ठेवावी.तुम्हाला भविष्यात ती कमी येईल.
‘या’ आठवड्यात लागणार निकाल
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीची (Maharashtra Board Result 2024) परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत झाली. तर, इयत्ता दहावीची परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च या कालावधीत पार पडली. यावेळी बारावीच्या परीक्षेला एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर, दहावीच्या परीक्षेत जवळपास 16 लाख विद्यार्थी बसले होते. आता विद्यार्थी निकालाची वाट बघत आहेत.
News Title- Maharashtra Board Result 2024
महत्वाच्या बातम्या-
“राजकारणात भाजपला पोरंच होत नाही, म्हणून नकली संताने…”
होर्डिंग दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ आला समोर!
“ज्या रस्त्यावर लोकांचा मृत्यू झाला तिथे मोदींनी..”, संजय राऊत संतापले
राखी सावंतची प्रकृती अत्यंत खालावली, जीवनमरणाचा संघर्ष?; जवळच्या व्यक्तीकडून अपडेट
केरळनंतर राज्यात मान्सून कधी दाखल होणार?; हवामान खात्याकडून मोठी अपडेट