SSC Result l महाराष्ट्र बोर्डाने 12वीचा निकाल काल म्हणजेच 21 मे रोजी जाहीर केला आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा वाढली आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना व पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे.
दहावीचा निकाल 27 मे पर्यंत लागणार :
दहावीच्या निकालासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यानुसार दहावीचा निकाल हा 27 मे 2024 पर्यंत लागणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. कारण अकरावीची प्रवेश प्रक्रिया 24 तारखेपासून सुरु होणार आहे.
महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होते. याशिवाय इतर शहरांमध्ये अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑफलाईन स्वरूपात होत असते, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. तसेच 10वी चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकतात. मात्र निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक, आईचे नाव, रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असणार आहे.
SSC Result l जुलै महिन्यात पुन्हा होणार बारावीची परीक्षा :
यंदाच्या वर्षी बारावीचा निकाल हा तब्बल आठ दिवस अगोदर जाहीर झाला आहे. राज्यातील मतदान पार पडल्यानंतर बारावीकच निकाल जाहीर करण्यात आला असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा बारावीच्या परीक्षेला बसायचं असेल तर ते पुन्हा परीक्षेला बसू शकतात.
जे विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत नापास झाले आहेत त्यांच्यासाठी 16 जुलैच्या दरम्यान पुन्हा परीक्षा होणार आहे. नापास विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी शिक्षण मंडळाने दिली आहे. मात्र याचा निकाल हा ऑगस्टमध्ये जाहीर होणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं आहे.
News Title : Maharashtra Board SSC Result Date
महत्त्वाच्या बातम्या-
एलिमिनेटर सामन्यात RCB चं पारडं जड राहणार; तर राजस्थानचा संघ पुन्हा ती चूक करणार?
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे अपघातातील आरोपीने आमदाराच्या मुलालाही दिला होता त्रास, आईच्या आरोपांनी खळबळ
पुण्यातील कार अपघातातील अग्रवाल कुटुंबीयांचं थेट अंडरवर्ल्ड कनेक्शन? नेमकं प्रकरण काय
‘या’ राशींच्या लोकांची होणार चांदी, मिळणार पैसाच पैसा