राज्यात पुढील २ दिवस पावसासह गारपिटीचा इशारा; ऑरेंज अलर्ट… पाहा कुठे कुठे आहे इशारा

पुणे: राज्यात येत्या दोन दिवसांत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची (Weather Update) शक्यता असून काही भागांत गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातून थंडी बऱ्यापैकी गायब झाली असून, ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

काय आहे हवामान स्थिती?

ईशान्येकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणारे वारे यांचा मेळ मध्य भारतावर होत असल्याने पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.

Weather Update | कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

ऑरेंज अलर्ट (वादळी वाऱ्यासह गारपीट): धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर (आज, तुरळक ठिकाणी)
यलो अलर्ट (विजांसह जोरदार पाऊस): विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे.
पावसाचा अंदाज: पुणे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी (दि. २७) तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

थंडी गायब, ढगाळ वातावरण:

राज्यातून थंडी बऱ्यापैकी गायब झाली असून, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.

हवामान विभागाचा इशारा:

नागरिकांनी सतर्क राहून, हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. विजा चमकत असताना घराबाहेर पडणे टाळावे.

महत्त्वाच्या बातम्या- 

क्रेडिट कार्ड वापरणारांसाठी महत्त्वाची माहिती, आत्ताच वाचा नाहीतर भरावा लागेल मोठा दंड

मुंबईकरांनो सावधान… प्रत्येक श्वासागणिक तुमच्या शरीरात चाललंय विष!, सगळी माहिती नीट वाचा

PMPML बसने प्रवास करणाऱ्या ‘त्या’ प्रवाशांसाठी खूशखबर, आता ही खास सुविधा मिळणार!

आता तुमच्या घराच्या जवळ मिळणार गंगाजल, तेही फक्त ३० रुपयांत!, कसं ते पाहा…

शेकोटी करत असाल तर सावधान, ‘या’ गोष्टी कराल तर दाखल होऊ शकतो गुन्हा!