Maharashtra Budget 2024 | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता घोषणांचा पाऊस केला आहे. यामध्ये काही योजनांची देखील घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यात कुटुंबाला प्रत्येकी वर्षातून तीन सिलिंडर मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. (Maharashtra Budget 2024)
अर्थसंकल्पात मोठी घोषणा
अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची सुरूवात करत असताना विठुरायाला वंदन केलं. “बोल पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”, हा अभंग म्हणत अजित पवारांनी 2024-25 सालचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी पहिली महत्त्वाची घोषणा ही वारकऱ्यांची केली आहे. प्रती दिंडीला 20 हजार देण्यात येणार आहे.
तसेच देहू आणि आळंदी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. वारीचा प्रस्ताव हा युनेस्कोकडे पाठवणार असल्याची घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडत असताना केली. याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय. (Maharashtra Budget 2024)
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा
सध्या महागाईने सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील विरोधकांनी गॅस सिलिंडरच्या दराबाबत सत्ताधाऱ्यावर आरोप केले होते. हीच बाब लक्षात घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीर सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली होती. यामुळे आता राज्य सरकारने सिलिंडरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Budget 2024)
ते म्हणाले की, वर्षाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेच्या माध्यमातून तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. पर्यावरण संरक्षणाला ही योजना सहाय्यभूत ठरेल. 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, असं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
News Title – Maharashtra Budget 2024 Ajit Pawar Announce Mukhyamantri Annapurna Yojana
महत्त्वाच्या बातम्या
गुड न्यूज! महिलांना दर महिन्याला मिळणार ‘इतके’ रुपये; शिंदे सरकारची मोठी घोषणा
मोठी बातमी ! चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे…, विधानपरिषदेसाठी भाजपची यादी समोर
पुणे पोर्शे अपघात प्रकरणी विरोधकांनी फडणविसांना घेरलं; सभागृहात जोरदार खडाजंगी
चाहत्यांना धक्का! अभिनेत्री हिना खानला झाला ‘हा’ कॅन्सर
“प्रेमात असाल तर तुम्ही लग्नाशिवायही..”; रिलेशनशिपबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य