Maharashtra Budget 2024 | विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प आज (28 जुन) अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला. यामध्ये शेतकरी वर्ग, महिला वर्ग, तरुण तसेच इतर घटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना (Maharashtra Budget 2024) कायम ठेवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा झाल्या?
-शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार.
– कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचं अनुदान.
– गाई दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान 1 जुलैपासून देण्यात येणार.
– येत्या दोन वर्षात 163 सिंचन प्रकल्प पूर्ण होतील
– सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड करून 15,000 कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर झालेला आहे
– 3200 कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येणार आहे
– शेतकरी यांना दिवसा विज पुरवठा करण्यासाठी 15,000 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येत आहे
– मागेल त्याला सौरपंप दिला जाणार आहे.
– अभ्यासक्रम पुर्ण करणारे तरुण जास्त आहे.
– 10 हजार रुपये विद्यावेतन दिल जाईल.
– संजय गांधी निराधार योजनेला (Maharashtra Budget 2024) 1 हजारावरुन दीड हजार रुपयांच अनुदान मिळालं.
– शेती कृषी पंपाचे सर्व थकित बील माफ करण्यात आलंय. यासोबतच वारकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
वारकऱ्यांसाठीही मोठ्या घोषणा
तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज प्रस्थान होत आहे. लाखो वारकरी आहेत प्रत्येकी वारीला 20 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
– सर्व वारकरी यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
– मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
– पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित.
– प्रति दिंडी 20 हजार रुपये दिले जाणार, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार.
News Title – Maharashtra Budget 2024 Announcements for Farmers
महत्त्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! महिलांना दर महिन्याला मिळणार ‘इतके’ रुपये; शिंदे सरकारची मोठी घोषणा
मोठी बातमी ! चित्रा वाघ, माधवी नाईक ते रावसाहेब दानवे…, विधानपरिषदेसाठी भाजपची यादी समोर
पुणे पोर्शे अपघात प्रकरणी विरोधकांनी फडणविसांना घेरलं; सभागृहात जोरदार खडाजंगी
चाहत्यांना धक्का! अभिनेत्री हिना खानला झाला ‘हा’ कॅन्सर
“प्रेमात असाल तर तुम्ही लग्नाशिवायही..”; रिलेशनशिपबाबत नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं वक्तव्य