महत्वाची बातमी! ‘या’ कुटुंबांना वर्षाला 3 मोफत गॅस सिलिंडर मिळणार!

Maharashtra Budget 2024 | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना दरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता घोषणांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये काही योजनांची देखील घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यात कुटुंबाला प्रत्येकी वर्षातून तीन सिलिंडर मोफत मिळणार असल्याची घोषणा केली आहे. (Maharashtra Budget 2024)

अजित पवारांनी 2024-25 सालचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी फार महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा अजित पवारांनी केली आहे. पण ही योजना सरसकट सर्वांना लागू होणार नाही. यासाठी एक अट असणार आहे. राज्यातील 56 लाख 16 हजार कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे. (Maharashtra Budget 2024)

‘या’ महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार :

अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची केलेली घोषणा ही महिलांसाठी लाभदायक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलांना घरातील स्वयंपाक करावा लागतो. अशातच वाढती महागाई आणि गॅसचे वाढते दर लक्षात घेता 56 लाख 16 हजार कुटुंबांना वर्षातून तीन महिने गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याचं अजित पवारांनी अर्थसंकल्पात सांगितलं आहे. अशातच अजित पवारांनी यामध्ये पिवळं आणि केसरी रंगाचं रेशन कार्ड असणाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे असं सांगितलं आहे. (Maharashtra Budget 2024)

महिलांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा : 

  1. 2023-24 पासून लेक लाडकी ही योजना मुलीच्या जन्मापासून करण्यात आली. मुलगी वयाच्या अठरा वर्षांपर्यंत होईल तिला टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रूपये.

2) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रूपये दरवर्षी सुमारे 46 कोटी रूपये निधी.

3) 1 मे, 2024 नंतर जन्माला आलेल्या बाळाच्या नावाची नोंद ही त्याच्या आईच्या त्याच्या वडिलांच्या तसेच आडनाव अशा क्रमाने सरकारी दस्तऐवजावर नमूद करण्यात येईल.

4) तसेच पिंक ई रिक्षा या 17 शहरांमधील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदी करता येईल. तसेच यासाठी 180 कोटींचा निधी वापरण्यात येणार असल्याचं अर्थसंकल्पात सांगितलं आहे.

5) शुभमंगल नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारं अनुदान हे 10 हजारांहून 25 हजारांवर आहे.

6) 1 कोटी 25 लाख 66 हजार 986 घरांना नळजोडणी.

News Title – Maharashtra Budget 2024 For Women Scheme

महत्त्वाच्या बातम्या

Diabetes रुग्णांसाठी जांभूळ एक वरदानच; जाणून घ्या याचे फायदे

“थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प, दिलेलं आश्वासन पूर्ण करू”

“लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींचा माईक बंद केला”, नवनिर्वाचित खासदारांचा गंभीर आरोप

आचार्य चाणक्यांनी सांगितलं विवाह आणि वयाचं महत्त्व!

अजित पवारांच्या बजेटमध्ये कुणाला काय मिळालं?; A To Z माहिती वाचा एका क्लिकवर