महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिकवेळा अर्थसंकल्प कुणी मांडला?, अजितदादा कितव्या नंबरवर?

Maharashtra Budget 2025 Ajit Pawar new record

Maharashtra Budget 2025 | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज 10 मार्चरोजी राज्याचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे राज्यातील नागरिक, शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी कोणत्या घोषणा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Budget 2025)

अजित पवारांचा ऐतिहासिक विक्रम

हा अर्थसंकल्प सादर करताच अजित पवार महाराष्ट्रातील सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या नेत्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहेत. आतापर्यंत शेषराव वानखेडे (Sheshrao Wankhede) यांनी सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे, तर अजित पवार आज 11व्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यांच्या पाठोपाठ जयंत पाटील (Jayant Patil) यांनी 10 आणि सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.

लाडकी बहिण योजना आणि शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा?

महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करत महिलांना दरमहा 1500 देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकीपूर्वी ही रक्कम 2100 करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात ही रक्कम वाढवली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

तसेच, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी वाढवण्याची शक्यता आहे. सध्या या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 अनुदान मिळते, परंतु सरकारने ती रक्कम 9000 करण्याचे आश्वासन दिले होते. (Maharashtra Budget 2025)

अर्थसंकल्पावर संपूर्ण राज्याचे लक्ष

अजित पवार यांना आर्थिक शिस्तीचा कट्टर प्रशासक मानले जाते. त्यांच्या अर्थसंकल्पात कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा यांना मोठा निधी दिला जातो. यंदाच्या अर्थसंकल्पातून लोकाभिमुख निर्णय येणार का, याची उत्सुकता जनतेला आहे.

Title : Maharashtra Budget 2025 Ajit Pawar new record

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .