Maharashtra Budget 2025 | राज्याचा 2025-26 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज 10 मार्चरोजी सादर करणार आहेत. महायुती सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाकडे (Maharashtra Budget 2025) राज्यातील जनतेचं विशेष लक्ष लागलं आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं सरकार पूर्ण करणार का, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
लाडकी बहीण योजनेत वाढ होणार?
महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना दरमहा 1500 दिले जात आहेत. मात्र, सरकारने निवडणुकीदरम्यान ही रक्कम 2100 करण्याचं आश्वासन दिलं होतं. आता अर्थसंकल्पात हे आश्वासन पूर्ण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा?
शेतकऱ्यांची थकित कर्जं माफ करण्याच्या वचनाला महत्त्व देत महायुती सरकार कर्जमाफीसाठी मोठी घोषणा करणार का, याची देखील उत्सुकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यासंदर्भात आश्वासन दिलं होतं.
नमो शेतकरी महासन्मान निधीत वाढ?
महायुती सरकारने (Maharashtra Budget 2025) सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत सध्या शेतकऱ्यांना वार्षिक 6000 दिले जातात. ही रक्कम 9000 करण्याचा सरकारचा विचार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आजच्या अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
महायुती सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि इतर महत्त्वाच्या योजना पूर्ण करण्यासाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
Title : Maharashtra Budget 2025 today