Maharashtra Cabinet | महाराष्ट्रात पुन्हा एकदा फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रमंडळ विस्तार देखील पार पडलाय. मागच्या रविवारी, महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. यंदा मंत्रीमंडळात तिन्ही पक्षांकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली.तर काही माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आलाय. (Maharashtra Cabinet )
शपथविधी पार पडल्यानंतर कोणत्या पक्षाला कोणती खाती जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर खातेवाटपाबाबतचा फॉर्म्युला समोर आला आहे. खातेवाटपावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी सातत्याने खलबतं सुरु होती. काही खात्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली.
खातेवाटपाचा फॉर्म्युला समोर
महायुतीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना कोणती खाती मिळणार याची माहिती समोर आली आहे. यानुसार भाजपकडे महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि ऊर्जा ही चार खाती असणार आहेत.तर, शिवसेनेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं असेल.यानंतर राष्ट्रवादीकडे अर्थ खातं आणि उत्पादन शुल्क खातं असेल, अशी चर्चा आहे. (Maharashtra Cabinet )
पुढील 24 तासात महायुतीच्या खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खातेवाटपाची यादी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली जाईल. त्यामुळे महायुतीचा खातेवाटपचा फॉर्म्युला अखेर ठरल्याचे बोललं जात आहे. त्यात अर्थ खाते अगोदर भाजपाकडे जाणार, अशी चर्चा होती. मात्र, ते खाते अजितदादांकडेच असणार, असं स्पष्ट झालंय.
तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या खात्यावरून नाराज होते ते गृहखाते देखील भाकपाकडेच राहणार आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये गृहखात्यावरुन मोठा वाद झाला होता. मात्र अखेर भाजप स्वत:कडे गृहखाते ठेवण्यास यशस्वी झाला. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते दिले जाणार आहे.
‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
1) चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा
2) राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा
3) हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
4) चंद्रकांत पाटील, भाजपा
5) गिरीश महाजन, भाजपा
6) गुलाबराव पाटील, शिवसेना
7) गणेश नाईक, भाजपा
8) दादा भुसे, शिवसेना (Maharashtra Cabinet )
9) संजय राठोड, शिवसेना
10) धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस
11) मंगलप्रभात लोढा, भाजपा
12) उदय सामंत, शिवसेना
13) जयकुमार रावल, भाजपा
14) पंकजा मुंडे, भाजपा
15) अतुल सावे, भाजपा
16) अशोक उईके, भाजपा
17) शंभूराज देसाई, शिवसेना
18) आशिष शेलार, भाजपा
19) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
20) आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
21) शिवेंद्रराजे भोसले, भाजपा
22) माणिकराव कोकाटे, भाजपा
23) जयकुमार गोरे, भाजपा
24) नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस
25) संजय सावकारे, भाजपा,
26) संजय शिरसाट – शिवसेना
27) प्रताप सरनाईक, शिवसेना
28) भरत गोगावले, शिवसेना
29) मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
30) नितेश राणे, भाजपा
31) आकाश फुंडकर, भाजपा
‘या’ नेत्यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ :
32) बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
33) प्रकाश आबिटकर, शिवसेना
34) माधुरी मिसाळ, भाजपा (राज्यमंत्री)
35) आशिष जैस्वाल, शिवसेना (राज्यमंत्री)
36) पंकज भोयर, भाजपा (राज्यमंत्री)
37) मेघना बोर्डीकर, भाजपा (राज्यमंत्री)
38) इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (राज्यमंत्री)
39) योगेश कदम, शिवसेना (राज्यमंत्री)
News Title – Maharashtra Cabinet Account Allocation Formula
महत्त्वाच्या बातम्या-
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना धक्का, ‘पुष्पा’ पुन्हा जाणार तुरुंगात?
आज संकष्टी चतुर्थी, बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ!
‘दया कुछ तो गड़बड़ है’; उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट
‘मला सोनिया गांधी मुख्यमंत्री करणार होत्या’; भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
संसदेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला ‘इतकी’ मते विरोधात पडली!