Maharashtra l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. यानंतर सर्वांचंच लक्ष हे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं होतं. मात्र आता अखेर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडत आहेत. तर यावेळी या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
Maharashtra l या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली “
1) नितेश राणे : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजप आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते गेल्या तीन विधानसभा निवडणुकींमध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत. अशातच आता यंदाच्या वर्षी त्यांना मंत्रिपद मिळालं आहे.
2) मेघना बोर्डीकर : जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्या दोन वेळा या मतदारसंघातून जिंकून आल्या आहेत.
3) माधुरी मिसाळ : पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माधुरी मिसाळ या 2009 पासून या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्या सलग 4 वेळा पर्वती मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.
4) गणेश नाईक : भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हे महायुती सरकारमध्ये पहिल्यांदा मंत्री होत आहेत. तसेच गणेश नाईक हे भाजपचे नवी मुंबईतील ताकदवान नेते आहेत.
5) जयकुमार गोरे : जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. गोरे हे सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून चारवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
6) शिवेंद्रराजे भोसले : सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले शिवेंद्रराजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवेंद्रराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. तसेच त्यांची साताऱ्यात मोठी ताकद देखील आहे.
7) पंकज भोयर : वर्धा मतदारसंघाचे आमदार पंकज भोयरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. हे सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यावर पक्षाने आता मंत्रिपदाची मोठी संधी दिली आहे.
8) अशोक उईके : अशोक उईके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच हे राळेगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. ते 2014, 2019 आणि 2024 च्या निवडणुकांमध्ये सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
9) आकाश फुंडकर : बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव विधानसभा मतदारसंघामधून निवडणून आलेले आकाश फुंडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच ते खामगांव मतदारसंघातून सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
News Title : Maharashtra cabinet expansion this MLAs got first opportunity in maharashtra cabinet
महत्वाच्या बातम्या –
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला सुरवात; ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेमध्ये नाराजी; बड्या नेत्यानी दिला राजीनामा
“थोड्याच वेळात मंत्र्याच्या भूमिकेत दिसेन हे नक्की”, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
परभणी हिंसाचार प्रकरणातील ‘त्या’ तरुणाचा कोठडीतच मृत्यू, वातावरण तापणार?
अखेर फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 42 मंत्र्यांची नाव फिक्स! पाहा संपूर्ण यादी