Maharashtra Cabinet expansion | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही या विधानसभेत गेमचेंजर ठरली. महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी ही योजना आणली होती. त्याला राज्यभरातून महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. महायुतीला विधानसभेत घवघवीत यश मिळालं. महायुतीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. यानंतर सर्वांचंच लक्ष हे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं होतं. अखेर याला मुहूर्त मिळाला आहे. (Maharashtra Cabinet expansion)
आज 15 डिसेंबररोजी, नागपूर येथे महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार आहे. यात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. तसेच, फडणवीस सरकारमध्ये काही महिला आमदारांची देखील वर्णी लागणार आहे.
विधानसभेत भाजपाच्या 14, शिवसेनेच्या 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदार निवडून आल्या. सध्या ज्या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहेत त्यात भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्या नावाचा समावेश मंत्रीमंडळामध्ये (Maharashtra Cabinet expansion) करण्यात आल्याची माहिती आहे.
महायुतीतील जवळपास चार महिला आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अदिती तटकरे यांचे नाव सर्वात वर आहे. तर भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांची नावे चर्चेत आहेत. (Maharashtra Cabinet expansion)
भाजपच्या विजयी महिला महिला आमदार-
श्वेता महाले (चिकली मतदारसंघ)
मेघना बोर्डीकर (जिंतूर)
देवयानी फरांदे (नाशिक मध्य)
सीमा हिरे (नाशिक पश्चिम)
मंदा म्हात्रे (बेलापूर)
मनीषा चौधरी (दहिसर)
विद्या ठाकूर (गोरेगाव)
माधुरी मिसाळ (पर्वती)
मोनिका राजळे (शेवगाव)
नमिता मुंदडा (कैज)
श्रीजया चव्हाण (भोकर)
सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व)
स्नेहा पंडित (वसई) आणि
अनुराधा चव्हाण (फुलंब्री) (Maharashtra Cabinet expansion )
राष्ट्रवादी व शिवसेना विजयी महिला आमदार-
सुलभा खोडके (अमरावती)
सरोज अहिरे (देवळाली)
सना मलिक (अनुशक्तीनगर)
अदिती तटकरे (श्रीवर्धन)
मंजुळा गावित (साक्री)
संजना जाधव (कन्नड) (Maharashtra Cabinet expansion )
News Title : Maharashtra Cabinet expansion Women Ministers
महत्वाच्या बातम्या –
अवघ्या काही तासात राज्याला मिळणार नवे मंत्री; ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा
ग्राहकांना सुखद धक्का! सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी उतरले भाव
मंत्रीपदासाठी भाजपकडून पहिला फोन नितेश राणेंना, अजून कुणाकुणाला फोन?
आज या’ राशींचं भाग्य खुलणार, राजकारणात लागणार मोठ्या पदाची लॉटरी
भावी मंत्र्यांना मध्यरात्री कॉल, शिवसेनेकडून ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?