फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी?, मोठी अपडेट समोर

Maharashtra Cabinet | काल 5 डिसेंबर, गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. तर, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता सर्वांचं लक्ष हे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. (Maharashtra Cabinet)

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा 11 किंवा 12 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ खाते वाटपाबाबतची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे.

मंत्रीमंडळ विस्तार कधी?

यामध्ये भाजपचे 11 ते 12 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 9 ते 10 मंत्रीपदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 8 ते 9 मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. महायुतीचे एकूण किती नेते मंत्रीपदाची शपथ घेणार याबाबत येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होईल.

काल झालेल्या शपथविधी सोहळ्यात फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच शपथ घेतली आहे. आता मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वांना प्रतीक्षा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते पुन्हा मिळावे, यासाठी ते आग्रही असून भाजप त्यास अनुकूल आहे. त्यांनी आणखी काही खात्यांची देखील मागणी केली आहे. (Maharashtra Cabinet)

शिंदे-पवार यांना कोणती खाती मिळणार?

दुसरीकडे एकनाथ शिंदे हे गृह खात्याबाबत अजूनही ठाम असल्याचं कळतंय. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले असले तरी शिंदे यांनी गृह खात्याचा आग्रह कायम ठेवला आहे. मात्र भाजपने त्यास ठाम नकार दिला असून त्याऐवजी महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते त्यांना देण्याचा प्रस्ताव दिला आहे.

सध्या शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी द्यायची, यावरूनही गोंधळ असून अनेक नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन मंत्रीपदाची मागणी केली आहे. त्यातच भाजपकडून अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर आक्षेप घेतला जात असल्याचं देखील बोललं जातंय. (Maharashtra Cabinet)

News Title-  Maharashtra Cabinet Extension update 

महत्वाच्या बातम्या-

शपथविधी होताच वाहनचालकांना दिलासा, राज्यात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त?

लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

आज धनवृद्धीचे योग तर ‘या’ राशींना मिळेल प्रेमाची साथ!

मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेणार?, अमृता फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

अजितदादांचा नवा विक्रम! पुन्हा एकदा ‘उपमुख्यमंत्री’ पदावर विराजमान